महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटिल कृषि महाविद्यालय विळद घाट येथील कृषि कन्यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांबाबत मार्गदर्शन केले
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटिल कृषि महाविद्यालय विळद घाट येथील कृषि कन्यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांबाबत मार्गदर्शन केले

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी / अहिल्यानगर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटिल कृषि महाविद्यालय विळद घाट येथील कृषि कन्यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांबाबत मार्गदर्शन 
करताना डोंगरगण ता. नगर या गावची संपूर्ण पाहणी करून गावाचा संपूर्ण नकाशा मंदिरासमोर रेखाटला.
कृषीकन्या जाधव स्नेहल, कदम वैष्णवी,खंडागळे वैष्णवी, लटके रसिका,लोखंडे प्रज्ञा, मोढवे श्रावणी यांनी डोंगरगण येथे गाव विकासासाठी लोक सहभागी ग्रामीण मूल्यांकनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत त कृषिकन्या यांनी गावच्या नकाशाचा आराखडा तयार करून दाखवला. यात गावातील शाळा, दुकाने, मंदिरे तसेच अन्य सोयी सुविधा कोठे आहेत, याबद्दल जनजागृती केली. कृषीकन्यांनी रेखाटलेल्या नकाशाची सरपंच सौ.वैशाली मते तसेच ग्रामस्थांनी ही नकाशा पाहून कृषीकन्यांचे कौतुक केले. कृषीकन्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाय योजनांबद्दल शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन केले. या
वेळी प्राचार्य डॉ. एस. बी. राऊत, प्रा. के. एस. दांगडे, प्रा. पी. सी ठोंबरे, कार्यक्रम अधिकारी या सर्वांचे विशेष मार्गदर्शन लाभले.



