पिंपळगाव माळवी कृषि कन्यांनी केले ग्रामीण मुल्यमापन सर्वेक्षण
पिंपळगाव माळवी कृषि कन्यांनी केले ग्रामीण मुल्यमापन सर्वेक्षण

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
पिंपळगाव माळवी कृषि कन्यांनी केले ग्रामीण मुल्यमापन सर्वेक्षण
पिंपळगाव माळवी :- नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यक्रमानुसार ग्रामीण मुल्यमापन सर्वेक्षणाचे आयोजन केले. यांमध्ये मुळे अश्विनी, मुठे साक्षी, निमसे मानसी, राऊत प्रतीक्षा, रोडे साक्षी, सावंतफुले किरण, या विद्यार्थ्यांनींनी गावाकऱ्यांच्या सहभागाने विविध मुल्यकांचे आराखडे तयार केले.
शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाने सामाजिक नकाशा, जलसंसाधन नकाशा, दळणवळण नकाशा, प्रमुख पिके, शेती यांत्रिकीकरण नकाशांचा वापर करून विद्यार्थ्यांनींनी गावातील विविध अडचणी जाणून घेतल्या; तसेच गावकऱ्यांसमवेत चर्चा करून त्यांचे अभिप्राय घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनींनी गावच्या सद्य स्थितीबद्दल जाणून घेतले. यावेळी गावातील विकास संदर्भात मार्गदर्शन केले.
गावातील विविध संसाधने आणि सामाजिक संस्थांचे चित्रण करण्यासाठी वविविध रंगाच्या रांगोळ्या वापरून सामाजिक संसाधन नकाशा तयार करण्यात आले. या सर्व क्षेणाद्वारे विद्यार्थ्यांनींनी ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांचे जीवन त्यांच्या शेती व्यवसाय आणि संबंधित अडचणी जाणून घेतल्या.
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे कार्यक्रम अधिकारी प्रा. पूनम ठोबरे यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी सरपंच सौ. राधिका संजय प्रभुणे, उपसरपंच श्री मच्छिंद्र सोपाना झिने, ग्रामपंचायत अधिकारी श्री दत्तात्रय वाळके, ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता संदीप झिने,कृषि अधिकारी श्री घोलप ,गिरिधारीदास रामदास बैरागी (श्रीराम मंदिर पुजारी), विश्वनाथ गुंड (मेजर), ज्ञानदेव हरिभाऊ गुंड, बबन रंगनाथ गुंड, विश्वनाथ झिने, मोठेबाबा गुंड, विक्रम बोरा व इतर गावकरी आधी उपस्थित होते.



