महाराष्ट्र राज्य
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
[5/12, 8:39 am] J TEN NEWS: शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधीसध्या लग्नाचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटी आणि राजकारणी कुटुंबीयांचा लग्नसोहळा संपन्न होत असल्याचं दिसून येत आहे.
[5/12, 8:39 am] J TEN NEWS: सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटी आणि राजकारणी कुटुंबीयांचा लग्नसोहळा संपन्न होत असल्याचं दिसून येत आहे. [5/12, 8:39 am] J TEN NEWS: बिग बॉस फेम सूरज चव्हाण, अभिनेते आदेश बांदेकर यांचे सुपुत्र, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचे विवाह संपन्न झाले आहेत. [5/12, 8:40 am] J TEN NEWS: शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यासमवेत अभिनेत्री तेजस्वीनी लोणारीचा विवाह झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. [5/12, 8:40 am] J TEN NEWS: सातारा येथे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या कन्येचा विवाह रविराज देशमुख यांच्याशी संपन्न झाला. रेड कार्पेट आणि शाही शामियानातील या लग्नसोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती. [5/12, 8:40 am] J TEN NEWS: कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या शुभविवाह प्रसंगी, त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. [5/12, 8:41 am] J TEN NEWS: शेंद्रे, सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना परिसरात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते [5/12, 8:41 am] J TEN NEWS: या प्रसंगी, भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला, जो लातूरमधील ओल्या दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून वापरला जाईल. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. [5/12, 8:41 am] J TEN NEWS: लग्नासारख्या कौटुंबिक आणि आनंददायी सोहळ्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी हा निधी मोठा आधार ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. [5/12, 8:42 am] J TEN NEWS: या विवाह सोहळ्यामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर हेही आगे-मागे रांगेत बसल्याचं दिसून आलं.


