वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला लातूरमधून अटक; पोलिसांनी पकडताच केली 'पुष्पा' स्टाईल अॅक्शन
वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला लातूरमधून अटक; पोलिसांनी पकडताच केली 'पुष्पा' स्टाईल अॅक्शन

Source :- J Ten News Channel
मुख्यपृष्ठ / बातमी
[20/10, 9:39 am] J TEN NEWS: Ranjeet Kasle Arrest: वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला लातूरमधून अटक; पोलिसांनी पकडताच केली ‘पुष्पा’ स्टाईल अॅक्शनRanjeet Kasle Arrest: लातूर पोलीस त्याचबरोबर गुजरात पोलीस यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजीत कासलेला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
[20/10, 9:39 am] J TEN NEWS: Ranjeet Kasle Arrest: बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjeet Kasle Arrest) याला आज मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले यांच्याबाबत माहिती मिळाली. या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याकारणाने त्यांनी दोन दिवसापासून लातूर शहरात रणजीत कासले यास अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती. [20/10, 9:40 am] J TEN NEWS: लातूर पोलीस त्याचबरोबर गुजरात पोलीस यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजीत कासले यास गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कागदपत्राची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने रणजीत कासले यास गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर वाल्मीक कराड याबाबतच्या अनेक चित्रफिती सोशल मीडियावर रणजीत कासले यांनी व्हायरल केल्या होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर थेट आरोप केले होते.रणजीत कासलेवर आतापर्यंत 7 गुन्हे दाखल-
सदर प्रकरणी रणजीत कासले यास अटकही करण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत सात गुन्हा रणजीत कासले याच्यावर दाखल आहेत. गुजरात पोलिसांचा हा आठवा गुन्हा. बडतर्फ झाल्यानंतर रणजीत कासले याने मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडीओ करत अनेक खुलासे केले आहेत. अनेक नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर आरोपही केले आहेत.
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
– सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते.
– मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता
– परराज्यात गेले असता त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाण-घेवाण केली असा आरोप त्यांच्यावर होता.
– विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रंजीत कासले यांनी केला होता.
– तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले यांनी पोस्ट केले होते.
– आता त्यानंतर वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा कासलेने केला होता.


