महाराष्ट्र ग्रामीण
बीडमधील तरुणाला बेदम मारहाण आणि अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट; जुन्या प्रेयसीनेच रचला डाव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
बीडमधील तरुणाला बेदम मारहाण आणि अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट; जुन्या प्रेयसीनेच रचला डाव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ / बातमी
[14/9, 9:58 am] J TEN NEWS: Beed Crime : बीडमधील तरुणाला बेदम मारहाण आणि अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट; जुन्या प्रेयसीनेच रचला डाव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोरBeed Crime News: बीडमध्ये एका तरुणाचे अपहरण आणि बेदम मारहाण झालेल्या प्रकरणाच्या तपासात आता एक नवा ट्विस्ट आला असून जुन्या प्रेयसीनेच सुपारी देऊन तरुणाचे अपहरण केल्याचं समोर आलं आहे.
[14/9, 9:59 am] J TEN NEWS: Beed Crime : बीडमध्ये एका तरुणाचे अपहरण आणि बेदम मारहाण झालेल्या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले असून त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. या संपूर्ण घटनेच्या तपासात आता एक नवा ट्विस्ट आला असून जुन्या प्रियसीनेच सुपारी देऊन तरुणाचे अपहरण केल्याचं समोर आलं आहे. तर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अपहरण केलेल्या तरुणाची 14 तासात सुटका केली आहे. [14/9, 10:00 am] J TEN NEWS: मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ नन्नवरे यांना मारहाण करून अपहरण झाले होते. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. याप्रकरणी दिया नन्नवरे यांनी तक्रार दाखल केली होती. यात 2011 मध्ये दिया यांचे पहिले लग्न संतोष पवार याच्यासोबत झाले होते. मात्र त्याला दारूचे व्यसन होते. काही काळाने दिया आणि नागनाथ नन्नवरे यांचे प्रेम संबंध जुळले आणि अकरा वर्षापूर्वी ते दोघे पळून बीडमध्ये आले. तेव्हापासून दोघे सोबत वास्तव्यास आहेत. मात्र नागनाथ याचे यापूर्वी ज्योती काळे हिच्याशी प्रेम संबंध होते आणि ज्योतीनेच नागनाथचे अपहरण घडवून आणल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली आहे.दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ नन्नवरे यांना दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. नागनाथ नन्नवरे यांना मारहाण केल्यानंतर संबंधित टोळक्याने त्यांचे एका चारचाकी वाहनात अपहरण केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर नन्नवरे यांच्या पत्नी दिया नन्नवरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविध प्रलोभन देतं लॉजवर नेलं. तिथं तिच्याशी बळजबरी करण्यात आल्याचा प्रकार भंडारा शहरालगत असलेल्या जमिनी दाभा येथील साई लॉज इथं घडली. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 65 (1), 137 (2) पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करीत अटक करण्यात आली. प्रकाश सुखदेवे (33) असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि पीडिता हे दोघेही मोहाडी तालुक्यातील आहेत. अल्पवयीन मुलीला लॉजवर नेत असताना लॉज मालकानं ती परवानगी दिली कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत असून लॉज मालकावरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.


