लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण दुर्घटना; 2 चिमुकल्यांना चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण दुर्घटना; 2 चिमुकल्यांना चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ / बातमी
[6/9, 11:10 am] J TEN NEWS: Lalbaugcha Mumbai Accident : लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण दुर्घटना; 2 चिमुकल्यांना चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमीगणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. याच उत्साहात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.
[6/9, 11:10 am] J TEN NEWS: Lalbaugcha Mumbai Accident News : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज (शनिवार) राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आहे. [6/9, 11:11 am] J TEN NEWS: लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण दुर्घटना 2 चिमुकल्यांना चिरडलेयाच उत्साहात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात 2 वर्षांची चंद्रा वजणदार हिचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ 11 वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
[6/9, 11:11 am] J TEN NEWS: नेमकी कशी घडली घटना?शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने गाडी त्यांच्यावर घातले आणि कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध कलम 106, 125(इ), 281, 184, 187 (भारतीय न्याय संहिता 2023) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
दुसऱ्या दिवशी पहाटे बाप्पाला दिला जाणार शेवटचा निरोप
शनिवारी लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) परिसरात उड्डाणपुलाखाली भाविकांच्या गर्दीत बाप्पाला पहिला निरोप देण्यात येईल. त्यानंतर भायखळ्यातील हिंदुस्तान मशिद येथे दरवर्षीप्रमाणे मशिदीच्या समिती सदस्यांकडून मूर्तीचे स्वागत करण्यात येईल. मग अखेर गिरगाव चौपाटीवर पोहोचून ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात, पहाटेच्या वेळी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

