महाराष्ट्र राज्य
धूर दिसला म्हणून बाहेर पडले, काही क्षणात...; नागपूरच्या एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, लोखंडी मशीनचे तुकडे 500 मीटरपर्यंत उडाले!
धूर दिसला म्हणून बाहेर पडले, काही क्षणात...; नागपूरच्या एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, लोखंडी मशीनचे तुकडे 500 मीटरपर्यंत उडाले!

Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ / बातमी
[4/9, 8:41 am] J TEN NEWS: Nagpur Solar Explosives Blast: धूर दिसला म्हणून बाहेर पडले, काही क्षणात…; नागपूरच्या एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, लोखंडी मशीनचे तुकडे 500 मीटरपर्यंत उडाले!Nagpur Solar Explosives Blast: स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले.
[4/9, 8:42 am] J TEN NEWS: नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत (Nagpur Solar Explosives Blast) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट (Nagpur Solar Explosives Blast)झाला. सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतिक घडेल असा अंदाज आला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मात्र संबंधित प्लांटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही. तेवढ्यात स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले. (Nagpur Solar Explosives Blast) [4/9, 8:42 am] J TEN NEWS: नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत (Nagpur Solar Explosives Blast) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट (Nagpur Solar Explosives Blast)झाला. सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतिक घडेल असा अंदाज आला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मात्र संबंधित प्लांटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही. तेवढ्यात स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले. (Nagpur Solar Explosives Blast) [4/9, 8:42 am] J TEN NEWS: स्फोटात जखमींची संख्या 10काँक्रीटचा एक अख्खा किमान 500 किलो वजनाचा पिल्लर सोलार कंपनीचा बफर झोनच नाही तर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पलीकडच्या शेतामध्ये आत जाऊन कोसळला आहे. प्लांटमधून उडालेल्या काँक्रीटच्या तुकड्यांनी सोलार कंपनीच्या बफर झोनमध्ये लावलेल्या सौर ऊर्जेच्या पॅनल्सला मोठी हानी पोहोचवली आहे. स्फोटात जखमींची संख्या 10 असून कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी,सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे, धर्मपाल मनोहर, हे सर्व जखमी नावे आहे.स्फोटाआधी फायर झाल्याने कामगारांना प्लांटच्या बाहेर पडण्यास वेळ मिळाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, स्मात्र फोटात उडालेल्या मलब्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. या पूर्वी 17 डिसेंबर 2023 रोजी याच कंपनीत मोठा स्फोट होऊन 9 कामगारांचा मृत्यू झाला होता.
लोखंडी मशीनचे मोठे मोठे तुकडे महामार्ग लगत येऊन कोसळले
सोलार कंपनीपासून बाजार गावच्या दिशेने गेल्यावर कंपनीची लोखंडी संरक्षण जाळी ओलांडून म्हणजेच घडलेल्या प्लांट पासून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर प्लांट मधील लोखंडी मशीनचे मोठे मोठे तुकडे महामार्ग लगत येऊन कोसळले आहे. काही तुकडे तर एक व्यक्ती हलवू शकणार नाही एवढ्या प्रचंड वजनाचे असल्याने त्या वजनदार तुकड्यांना एवढ्या लांब पर्यंत फेकणारा स्फोट किती भयावह असेल याचा अंदाज देणारे आहे.


