दिल्ली

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जात स्वागत केलं. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जात स्वागत केलं. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला.

J Ten News Marathi 

मुख्यपृष्ठ / बातमी 

[5/12, 9:01 am] J TEN NEWS: Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना

Modi-Putin: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जात स्वागत केलं. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला.

[5/12, 9:01 am] J TEN NEWS: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं पालम विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत केलं. पुतिन विमानातून बाहेर येताच मोदींनी हस्तांदोलन केलं, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थाच्या दिशेनं पर्वास केला. विशेष बाब म्हणजे व्लादिमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांनी ज्या कारमधून प्रवास केला ती महाराष्ट्रात पासिंग झालेली होती. SUV Toyota फॉर्च्यूनरमधून दोन्ही नेत्यांनी प्रवास केला. तीन महिन्यांपूर्वी शांघाई शिखर संमेलनात मोदी आणि पुतिन यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता.

[5/12, 9:02 am] J TEN NEWS: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची तीन महिन्यापूर्वी शांघाय शिखर संमलेनात भेट झाली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एका बैठकीनंतर एकाच कारमधून प्रवास केला होता. शांघाय शिखर संमेलन चीनच्या तियानजीन शहरात आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर मोदी आणि पुतिन द्वीपक्षीय चर्चेसाठी एकाच कारमधून रवाना झाले होते.

मोदी आणि पुतिन यांचा महाराष्ट्र पासिंग कारमधून प्रवास
नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर व्लादिमीर पुतिन यांचं स्वागत केलं. यानंतर दोन्ही नेते SUV Toyota फॉर्च्यूनरमधून पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेनं रवाना झाले. ही कार महाराष्ट्र पासिंग असल्याचं व्हिडिओ पाहिल्यांनतर स्पष्ट होतं. त्या कारचा नंबर MH01EN5795 असा आहे.

[5/12, 9:02 am] J TEN NEWS: दोन्ही नेत्यांचा एकाच कारमधून प्रवास, ट्रम्प यांना मेसेज?
शांघाय शिखर परिषदेच्या वेळी व्लादिमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांनी एकाच कारमधून प्रवास करत रशिया आणि भारताचे संबंध मजबूत असल्याचा संदेश देण्यात आला होता, अशा चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. ट्रम्प यांनी दबाव टाकून देखील दोन्ही देशांचं संबंध कमजोर झाले नसल्याचे त्यातून दर्शवण्यात आलं होतं. आज पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला आहे.

मोदी स्वागताला आल्यानं आश्चर्य : क्रेमलिन
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या स्वागताला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील याचा अंदाज नव्हता असं रशियाचं राष्ट्रपती भवन क्रेमलिनकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, व्लादिमीर पुतिन 23 व्या भारत रशिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरुन पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत.

रशिया यूक्रेन युद्ध सुरु होण्यापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2021 ला व्लादिमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर चार वर्षांनी पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये मॉस्कोत पुतिन यांची भेट घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button