*पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर प्रात्यक्षिक; कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्याचा सहभाग व सहकार्य*
*पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर प्रात्यक्षिक; कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्याचा सहभाग व सहकार्य*

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
*पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर प्रात्यक्षिक; कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्याचा सहभाग व सहकार्य*

कृषी विभाग महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या.,अकोला
जिल्हा कार्यालय,अहिल्यानगर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम महाबीज तूर गोदावरी श्री. प्रतापराव गणपतराव झिने रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहिल्यानगर यांच्या शेतात, महाबीज तूर गोदावरी या वाणाची लागवड केलेल्या क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाकरिता महाबीज व कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. सुधाकर बोराळे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहिल्यानगर)
प्रमुख पाहुणे
मा. श्री. राजाभाऊ मोराळे (विभागीय व्यवस्थापक महाबीज, जालना)
मा. श्री. दत्तात्रय डमाळे (उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर)
मा. श्री. प्रदीप लाटे (प्रकल्प समन्वयक, आत्मा, अहमदनगर)
मा. श्री. सुनील दौंड (जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, अहमदनगर)
मा. श्री. नितीन दानवले (प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे)म.कृ.वि., राहुरी)
मा. श्री. अशोक वाळके (तालुका कृषि अधिकारी, नगर)
श्री. रविंद्र काळभोर (कृषि क्षेत्र अधिकारी, अ. नगर)
श्री. विजय सोमवंशी (उपकृषि अधिकारी, जेऊर)
श्रीमती. माधवी घोरपडे (मंडळ कृषि
अधिकारी, जेऊर)
श्री. योगेश घोलप (सहाय्यक कृषि अधिकारी, पिंपळगाव माळी)
श्री. प्रतापराव गणपतराव झिने (प्रगतीशील शेतकरी) उपस्थित होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषि महाविद्यालय विळदघाट, ता.जि.अहिल्यानगर ग्रामीण (कृषि) जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम (RAWE & AIA) सत्र २०२५-२६ अतंर्गत मौजे.पिंपळगाव येथे कार्यरत आहेत. या रावे कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. पूनम ठोबरे यांचे मार्गदर्शनाखाली कृषिकन्या–मुळे अश्विनी, मुठे साक्षी, निमसे मानसी, राऊत प्रतीक्षा, रोडे साक्षी, सावंतफुले किरण यांनी या कार्यक्रमाध्ये सहभाग व सहकार्य केले व महाविस्तार AI अँप ची माहिती दिली.
महाविस्तार AI अँप हे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर महाविस्तार (AI) आधारित विकसित करण्यात आलेले हे एक मोबाईल अँप आहे.यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी कृषी-विषयक माहिती व सेवा उपलब्ध होणार आहे. हे एक डिजिटल व्यासपीठ आहे. अॅपचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती संबंधित, हवामान, बाजारभाव, या विषयी माहिती देणे आहे, जेणेकरून त्यांना योग्य निर्णय घेता येईल आणि शेती उत्पादनात वाढ करता येईल.



