अहिल्यानगर

एक लग्न होऊनही नर्तिका दिपाली पाटीलच्या मागे लागला

एक लग्न होऊनही नर्तिका दिपाली पाटीलच्या मागे लागला

J Ten News Marathi 

मुख्यपृष्ठ / बातमी 

[6/12, 9:51 am] J TEN NEWS: Ahilyanagar Crime: एक लग्न होऊनही नर्तिका दिपाली पाटीलच्या मागे लागला, पत्नी नगरपरिषदेत भाजपची उमेदवार, कोण आहे संदीप गायकवाड?

Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं? या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
[6/12, 9:51 am] J TEN NEWS: Deepal Patil Suicide Jamkhed: जामखेडच्या खर्डा रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये कला केंद्रात नाचणाऱ्या दिपाली पाटील (वय 35) या नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेत असलेल्या राजकीय कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. संदीप सुरेश गायकवाड या व्यक्तीच्या दबावामुळे दिपाली पाटील हिने आत्महत्या (Suicide news) केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा (BJP) माजी नगरसेवक असलेल्या संदीप गायकवाड याने दिपालीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. विशेष म्हणजे संदीप गायकवाड (Sandeep Gaikwad) याचे लग्न झाले आहे. तरीही त्याला दिपाली पाटील हिच्याशी लग्न करायचे होते. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संदीप गायकवाड हा दिपालीला (Deepali Patil) त्रास देत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप गायकवाड याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Crime news in Marathi)
[6/12, 9:51 am] J TEN NEWS: सध्या जामखेडच्या राजकीय वर्तुळात या घटनेची प्रचंड चर्चा रंगली आहे. संदीप गायकवाड हा स्वत: भाजपचा माजी नगरसेवक होता. तर संदीप गायकवाड यांची पत्नी लता गायकवाड यांनी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे. याचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे.

[6/12, 9:52 am] J TEN NEWS: Deepali Patil Suicide news: दिपाली पाटीलच्या आत्महत्येनंतर रोहित पवारांची भाजपवर आगपाखड

अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळं तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली. या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढं आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली.. हीच आहे #party_with_difference भाजपा. आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष राहील.

Dancer Dipali Patil: नेमकं काय घडलं?
दिपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवासी होती. ती आपल्या मैत्रिणींसोबत जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. ती गुरुवारी सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. तसेच, दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. त्यामुळे, मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रुम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button