J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
[24/11, 8:48 am] J TEN NEWS: स्मृती मानधनाच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा त्रास का झाला?
डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण
विवाह विधीच्या अवघ्या काही तास आधी वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. तिच्या वडिलांवर सध्या सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
[24/11, 8:48 am] J TEN NEWS: अक्षतांची वेळ अवघ्या तीन तासांवर आली असताना विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि फलंदाज स्मृती मानधना हिच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणूव लागला. यामुळे रविवारी 23 नोव्हेंबर रोजी चालू असलेला स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह विधी पुढे ढकलण्यात आला आहे. सांगलीतील समडोळी रस्त्यावरील एका फार्म हाऊसवर मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत गेले तीन दिवस लग्न सोहळ्यातील विविध कार्यक्रम सुरू होते.
[24/11, 8:49 am] J TEN NEWS: स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना सांगलीतील सार्व्हित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराची लक्षणं होती. मुलीच्या लग्नात झालेल्या धावपळीमुळे, कामांमुळे त्यांना शारीरिक किंवा मानसिक ताण आला असावा आणि त्यामुळेच हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.