महाराष्ट्र राज्य
नांदेडच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट, पोलिसांच्या तपासात मुलीच्या वडिलांकडून वेगळीच माहिती समोर, म्हणाले...
नांदेडच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट, पोलिसांच्या तपासात मुलीच्या वडिलांकडून वेगळीच माहिती समोर, म्हणाले...

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
[30/11, 10:40 am] J TEN NEWS: Nanded Love Story Crime: नांदेडच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट, पोलिसांच्या तपासात मुलीच्या वडिलांकडून वेगळीच माहिती समोर, म्हणाले…Nanded Crime news: सक्षम ताटे स्वतः अन् प्रेयसीचे वडील आणि दोन्ही भाऊ अट्टल गुन्हेगार होते. नांदेडमधील संघटित गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. अल्लड वयातील या प्रेमाचा रक्तरंजित शेवट झालाय.
[30/11, 10:41 am] J TEN NEWS: Nanded Murder News: नांदेडच्या मिलिंद नगर परिसरात गुरुवारी प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या युवकाची हत्या झाली. यानंतर तरुणाच्या प्रेयसीने मृतदेहासोबत लग्न केल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. मयत मुलाच्या आईने जातीयवादातून मुलाची हत्या (Murder news) झाल्याची तक्रार दिली. या घटनेने समाज मन सुन्न झाले. मात्र, यातील मयत सक्षम आणि मुलीचे कुटुंब अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती डी वाय एसपी प्रशांत शिंदे यांनी दिली आहे. मयत सक्षम ताटे अन गजानन मामीडवार हे अट्टल गुन्हेगार होते. याच कारणामुळे सक्षमला नांदेड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. नुकताच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. यापूर्वी अनेक गुन्हे करताना सक्षमचे मामीडवार कुटुंबाच्या घरी येणे जाणे होते. त्यावेळी सक्षम ताटे (Saksham Tate Murder) याची गजानन मामीडवार यांची मुलगी आंचल हिच्याशी ओळख झाली. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे अन् आंचल मामीडवार (Anchal Mamidwar) यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र, स्वतः अट्टल गुन्हेगार असलेल्या मामीडवार कुटुंबाचा सक्षम या गुन्हेगाराशी आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला (Love Story) विरोध होता. याच विरोधातून मामीडवार कुटुंबाने सक्षमला संपवल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र, यामध्ये कितपत तथ्य आहे, याची अद्याप खात्री होऊ शकलेले नाही. जातीयवादातून हा खून झाल्याचा आरोप सक्षम ताटेच्या नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणातील मृत सक्षम ताटे अने मुलगी आंचल मामीडवार हे दोघे बारावी पास आहेत. (Nanded Girl married with boyfriend dead body) [30/11, 10:41 am] J TEN NEWS: नांदेडच्या मिलिंद नगर इटवारा परिसरात सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश मामीडवार व साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून हत्या (Murder news) केली. या घटनेनंतर आंचल मामीडवार या तरुणीने केलेली कृती राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आंचल मामीडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पडले. या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले होते. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.शुक्रवारी सक्षम ताटे याच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना आंचल मामीडवार त्याच्या घरी पोहोचली. सक्षम जिवंत नसला तरी मी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करुन मी कायम तिकडे त्याच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचे तिने सांगितले. सक्षम कायम माझ्या मनात असेल. तो जिवंत नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे, असेही आंचलने म्हटले होते.
[30/11, 10:42 am] J TEN NEWS: Nanded Love Story Murder: आंचल मामीडवार नेमकं काय म्हणाली?आमचं प्रेम होतं. पण माझ्या पप्पांना आम्हा दोघांची जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हतं. ते म्हणायचे, दुसरं कोणाशीही बोल मी लग्न लावून देतो. सक्षम बौद्ध होता, आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत. जात वेगळी असल्यामुळेच माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवले. आमच्या प्रेमसंबंधामुळेच त्याला मारण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आंचल मामीडवार हिने म्हटले होते.


