एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
[28/11, 8:27 pm] J TEN NEWS: काय प्रचार करायचा तो करा, एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णयMaharashtra Local Body Election : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार वेगात सुरु आहे. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. प्रचाराची मुदत वाढवण्यात आली आहे.
[28/11, 8:28 pm] J TEN NEWS: राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. [28/11, 8:28 pm] J TEN NEWS: निवडणूक आयोगाने दिली माहितीयाबाबत माहिती देताना निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे यांना म्हटले की, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल. [28/11, 8:30 pm] J TEN NEWS: Marathi News Politics Maharashtra nagar palika and nagar panchayat election campaign time extended till 1st December 10 pm
काय प्रचार करायचा तो करा, एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Maharashtra Local Body Election : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार वेगात सुरु आहे. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. प्रचाराची मुदत वाढवण्यात आली आहे.
काय प्रचार करायचा तो करा, एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!
राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने दिली माहिती
याबाबत माहिती देताना निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे यांना म्हटले की, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही

