राजकारण्यांना माझ्या पोराला गुन्हेगारीतून बाहेरच निघू द्यायचं नाही, निलेश घायवळच्या आईचा गौप्यस्फोट
राजकारण्यांना माझ्या पोराला गुन्हेगारीतून बाहेरच निघू द्यायचं नाही, निलेश घायवळच्या आईचा गौप्यस्फोट

Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ / बातमी
[10/10, 8:36 am] J TEN NEWS: Nilesh Ghaywal: राजकारण्यांना माझ्या पोराला गुन्हेगारीतून बाहेरच निघू द्यायचं नाही, निलेश घायवळच्या आईचा गौप्यस्फोटNilesh Ghaywal: कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे भाजपच्या राम शिंदे, संतोष बांगर, तानाजी सावंत आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी हितसंबंध असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता.
[10/10, 8:37 am] J TEN NEWS: Nilesh Ghaywal: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी कुख्यात गुंड निलेश घायवळ हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता. त्यामुळे विरोधकांनी ठरवून त्याला अडकवण्याचा कट रचला, असा खळबळजनक गौप्यस्फोट निलेश घायवळची आई कुसुम घायवळ (Kusum Ghaywal) यांनी केला. पुण्यातील एका गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) हा लंडनला पळून गेला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्याने सर्व नियम वाकवून पासपोर्ट मिळवला होता आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो परदेशात फरार झाला होता. यावरुन सध्या महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. निलेश घायवळ याचे अनेक राजकारण्यांशी घनिष्ट संबंध आहेत. या राजकारण्यांनीच त्याला परदेशात पळून जायला मदत केली, असे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश घायवळच्या आईने राजकारण्यांची पोलखोल करणारा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत निलेश घायवळ आणि राजकारण्यांच्या हितसंबंधांविषयी धक्कादायक माहिती दिली. [10/10, 8:37 am] J TEN NEWS: निलेशने स्वत:हून काही केले नाही, त्याच्याकडून करवून घेतले गेले. न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांत निर्दोषही सोडले. त्यानंतर आपण चांगले आयुष्य जगायचे, गुन्हेगारीच्या घाणीत आता जायचे नाही, असे त्याने मला सांगितले होते. त्याप्रमाणे गेल्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगले जीवन जगत होतो. परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत. त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही. त्यांनी राजकारणात येऊ नये, गुन्हेगारीत राहावे आणि जेलमध्येच जावे, अशी राजकारण्यांची इच्छा होती, असे निलेश घायवळच्या आईने सांगितले.Nilesh Ghaywal ZP Election: निलेश घायवळ जिल्हा परिषद निवडणुकीला उभा राहणार, पण त्यापूर्वीच विरोधकांनी गेम केला
निलेश घायवळ याच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाला राजकारणात प्रवेश करायचा होता. तो नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. मात्र, निलेशने राजकारणात येऊ नये म्हणून विरोधकांनी त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र रचले, असा दावा निलेशच्या आईने केला. निलेशला राजकारणाचे वेड आहे. दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. त्यांनी पळून जावे किंवा आपल्या मुलाने एखाद्याचा खून करावा, असे कोणत्या आईला वाटते? पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पण राजकारणी लोक त्याला फसवतात, त्याने गुन्हेगारीतच राहावे, यासाठी ते प्रयत्न करतात, अशी खंत निलेश घायवळच्या आईने बोलून दाखवली.

