महाराष्ट्र राज्य

मोठी बातमी! नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन जण खाली पडले; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

मोठी बातमी! नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन जण खाली पडले; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

Source :- J Ten News Media 

मुखपृष्ठ / बातमी 

[19/10, 9:11 am] J TEN NEWS: मोठी बातमी! नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन जण खाली पडले; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

Nashik News: काही वेळानंतर ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली की, जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळील ढिकलेनगर परिसरात तीन युवक रेल्वेतून खाली पडले आहेत.

[19/10, 9:14 am] J TEN NEWS: नाशिक : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रकसोलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसमधून (Karmabhoomi Express) तिघे युवक खाली पडल्याची भीषण दुर्घटना (Karmabhoomi Express) शनिवारी (ता. १८) रात्री नाशिक रोड परिसरात घडली. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शनिवार रात्री कर्मभूमी एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकावर न थांबता पुढे गेली. काही वेळानंतर ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली की, जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळील ढिकलेनगर परिसरात तीन युवक रेल्वेतून खाली पडले आहेत.(Karmabhoomi Express)

[19/10, 9:15 am] J TEN NEWS: Karmabhoomi Express: दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी
माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार भोळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 या दरम्यान दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळला.जखमी युवकास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत आणि जखमी युवकांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने, गर्दीमुळे दरवाजाजवळ उभे राहिलेल्या या युवकांचा तोल जाऊन ते खाली पडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी निघाले होते, याबाबत तपास सुरू आहे.

Karmabhoomi Express: इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेतून पडल्याने मृत आणि जखमी झालेल्यांकडे त्यांची ओळख पटवणारी कुठलीच कागदपत्रे नसल्याचे निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले. जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळी सणामुळे मुंबई भागात काम करणारे हे तिघेजण बिहारला आपल्या गावी जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान सध्या दिवाळी सणामुळे रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी आहे. धावत्या रेल्वेतून तिघेजण खाली पडल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे साईनाथ नगर भागातील रेल्वे लाईनजवळ राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनी या अपघाताची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानक उपप्रबंधक कार्यालयात दिली. रेल्वे पोलीस व नाशिकरोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

[19/10, 9:15 am] J TEN NEWS: Karmabhoomi Express: कुठे घडली घटना
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेली व बिहार राज्यातील रस्तोलकडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेस गाडी क्रमांक १२५४६ ही शनिवारी रात्री आठ वाजून १८ मिनिटांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आली. काही वेळाने कर्मभूमी एक्सप्रेस पुढे निघाल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील पवारवाडी जवळील साईनाथ नगर येथील मारुती मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली. कर्मभूमी एक्सप्रेस या धावत्या रेल्वेतून पडलेले दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. या घटनेत आणखी एक प्रवासी रेल्वे खाली पडून गंभीर जखमी झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button