Pune

मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आलंय; पुण्यातील वृद्धाला भामट्याचा फोन, तब्बल दीड कोटींना गंडा

मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आलंय; पुण्यातील वृद्धाला भामट्याचा फोन, तब्बल दीड कोटींना गंडा

Source :- J Ten News Channel

मुख्यपृष्ठ / क्राईम बातमी 

[21/10, 9:35 am] J TEN NEWS: Pune Crime News: मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आलंय; पुण्यातील वृद्धाला भामट्याचा फोन, तब्बल दीड कोटींना गंडा

Pune Crime News: राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकारी असल्याचा बनाव करत पुण्यात एका 70 वर्षीय नागरिकाची तब्बल 1 कोटी 44 लाख 60 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

[21/10, 9:35 am] J TEN NEWS: Pune Crime News: राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकारी असल्याचा बनाव करत पुण्यात एका 70 वर्षीय नागरिकाची तब्बल 1 कोटी 44 लाख 60 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तुमचं नाव पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी (Pahalgam Terror Attack) जोडलं गेलंय” अशी भीती दाखवत चोरट्याने हा आर्थिक गंडा घातला. पुण्याच्या (Pune) सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[21/10, 9:36 am] J TEN NEWS: Pune Crime News: कोथरुड परिसरातील वृद्धाची फोनद्वारे फसवणूक
तक्रारदार हे पुण्यातील कोथरुड येथील महात्मा सोसायटी रस्त्यावर राहणारे आहेत. 23 सप्टेंबर 2025 ते 08 ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ला “एनआयएचा वरिष्ठ अधिकारी” असल्याचे भासवले. त्याने सांगितले की, “तुमचं बँक खातं पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आर्थिक व्यवहारात वापरण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्यावर गंभीर संशय आहे. जर सहकार्य केलं नाही, तर कायदेशीर कारवाई होईल.”

Pune Crime News: भीतीचा फायदा घेत दीड कोटी उकळले
अचानक आलेल्या या धमकीने घाबरून गेलेल्या वृद्ध तक्रारदाराला चोरट्याने पुढची “प्रक्रिया” सांगितली. “संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत तुमच्या सर्व बँक खात्यातील रक्कम तात्पुरती ‘सुरक्षित खात्यात’ ट्रान्सफर करावी लागेल.” यानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने वेगवेगळ्या खात्यांतून 1.44 कोटी रुपय्ने चोरट्याने सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. काही दिवस गेल्यानंतरही रक्कम परत मिळाली नाही, आणि संबंधित व्यक्तीशी संपर्कही तुटला. यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

[21/10, 9:36 am] J TEN NEWS: Pune Crime News: सायबर पोलिसांचा तपास सुरु
तक्रारीवरून पुणे सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pune Crime News: पोलिसांचे जनतेला आवाहन
पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. “कोणतीही अनोळखी व्यक्ती स्वतःला सरकारी यंत्रणेतील अधिकारी असल्याचं सांगून तुमच्याकडून पैसे मागत असेल, तर अशा प्रकरणांना गांभीर्याने न घेता तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधा,” असा सल्ला देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button