महाराष्ट्र राज्य
कोल्हापूरच्या बड्या नेत्याला तरुणीकडून हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, मोबाईलवर अश्लील फोटो पाठवले अन्...
कोल्हापूरच्या बड्या नेत्याला तरुणीकडून हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, मोबाईलवर अश्लील फोटो पाठवले अन्...

Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ / बातमी
[10/10, 8:42 am] J TEN NEWS: Shivaji Patil Honey Trap Case : कोल्हापूरच्या बड्या नेत्याला तरुणीकडून हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, मोबाईलवर अश्लील फोटो पाठवले अन्…Shivaji Patil Honey Trap Case: चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाइलवर अश्लील संदेश आणि फोटो पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
[10/10, 8:43 am] J TEN NEWS: Shivaji Patil Honey Trap Case: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील चंदगडचे (Chandgad) आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांना मोबाइलवर अश्लील संदेश आणि फोटो पाठवून हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील (Thane) चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [10/10, 8:43 am] J TEN NEWS: पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका अनोळखी महिलेने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला साध्या चॅटिंगने संवाद सुरू झाला, त्यानंतर त्या महिलेने पाटील यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. हळूहळू संवाद वाढत गेल्यानंतर तिने काही तरुणींचे अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली.Shivaji Patil Honey Trap Case: दहा लाख द्या नाहीतर…
या महिलेने सुरुवातीला एक लाख, नंतर दोन लाख आणि अखेर पाच लाख अशा हप्त्यांमध्ये एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली. काही काळानंतर पाटील यांनी महिलेचा त्रास वाढल्यामुळे त्या महिलेला ब्लॉक केले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील फोटो आणि संदेश पाठवले. पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या आमदार पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर प्रकरणात आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, प्राथमिक तपासात हा सायबर हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.



