मुंबईचा राजा गणेशगल्लीतून निघाला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, लालबागचा राजा थोड्याचवेळात निघणार
मुंबईचा राजा गणेशगल्लीतून निघाला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, लालबागचा राजा थोड्याचवेळात निघणार
Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ / बातमी
[6/9, 6:01 am] J TEN NEWS: Ganpati Visarjan 2025 LIVE: मुंबईचा राजा गणेशगल्लीतून निघाला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, लालबागचा राजा थोड्याचवेळात निघणारGanpati visarjan 2025: आज लाडका गणपती बाप्पा घरी जाण्यासाठी निघणार आहे. मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, चिंतामणी या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याचवेळात सुरुवात होईल.
[6/9, 06:01 am] J TEN NEWS: Ganpati visarjan 2025: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आज विसर्जन होणार आहे. अनंत चतुदर्शीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात हजारो सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन (Ganesh i…see more [6/9, 06:02 am] J TEN NEWS: 10:34 AM (IST)• 06 Sep 2025
Chinchpolicha Chintamani Visarjan 2025: चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आरतीला सुरुवात
चिंचपोकळीचा चिंतामणी थोड्याचवेळात विसर्जनासाठी मंडपातून निघणार आहे. चिंतामणीच्या आरतीला सुरुवात
10:13 AM (IST)
• 06 Sep 2025
Lalbaugcha Raja Visrajan 2025: लालबागचा राजा थोड्याचवेळात मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ होणार
• 06 Sep 2025
Ganpati Visarjan 2025: हैदराबादच्या खत्रीबाद येथील 69 फुटी गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात [6/9, 06:03 am] J TEN NEWS: 10:07 AM (IST)
• 06 Sep 2025
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजाच्या मूर्तीची उत्तरपूजा सुरु
लालबागचा राजाच्या मूर्तीची उत्तरपूजा सुरु. आता लालबागच्या राजाची आरती केली जाईल. त्यानंतर लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघेल.
09:58 AM (IST)
• 06 Sep 2025
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज, विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा
लालबागच्या विसर्जनासाठी खास अत्याधुनिक तराफा
गिरगाव चौपाटीवर दरवर्षी उसळणारा भक्तिसागर आणि पूर्वीच्या दुप्पट आकारापेक्षा यावर्षी राजाच्या तराफ्याची रचना विशेष आहे….
त्यामुळे त्याला समुद्रात मार्गक्रमणासाठी कुठल्याही बोटीच्या साह्याची गरज भासणार नाही. कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा स्वतःच समुद लाटांवर स्वार होऊन आगेकूच करणार आहे..
विसर्जनावेळी भार सांभाळताना तो स्थिर राहावा, यासाठी विशेष अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला आहे. गुजरातमध्ये हा विशेष तराफा तयार करण्यात आला आहे….
विशेष म्हणजे, ३६० अंशांत पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर देखील यामध्ये बसवण्यात आले आहेत.
[6/9, 06:04 am] J TEN NEWS: 09:53 AM (IST)• 06 Sep 2025
Mumbai Ganpati visarjan live 2025: लालबाग परिसरात मानाचे गणपती विसर्जनसाठी निघाले
लालबाग परिसरात मानाचे गणपती विसर्जनसाठी निघाले. परळचा राजा गिरगावच्या दिशेने मार्गस्थ, मुंबईचा राजाही गिरगावच्या दिशेने निघाला. लालबागचा राजा थोड्याचवेळात मंडपातून बाहेर पडणार
09:43 AM (IST)
• 06 Sep 2025
Ganpati Visarjan: गणपती विसर्जनावर पावसाचं सावट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, मुंबईसह ठाण्यात देखील मुसळधार पाऊस बरसत आहे. ठाण्यात मागील २४ तासात ४४ मिलिमीटर इतका पाऊस पडलाय तर आज दिवसभर देखील मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला गेला आहे
08:40 AM (IST)
• 06 Sep 2025
Mumbai Ganpati visarjan 2025: गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाची जय्यत तयारी
गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती चौपाटीवर करण्यात आली आहे. सोबतच, मुंबई पोलिसांची देखील मोठी कुमक तैनात असणार आहे. परदेशी पाहुणे आणि व्हीव्हीआयपींना राज्य गणेशोत्सव बघता यावा यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून मंडपांची उभारणी केली गेली आहे. सोबतच, लहान घरगुती गणपती देखील यायला सुरुवात झाली आहे.
08:33 AM (IST)
• 06 Sep 2025
Mumbai Ganpati visarjan live 2025: परळचा रामाच्या रुपातील गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ
अधूनमधून पडत असलेल्या मुसळधार पावसात गणेश भक्तांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही…. या मुसळधार पावसात सुद्धा परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले आहेत… परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही मंडपातून आता पुढे गणेश गल्लीकडे मार्गस्थ होत आहेत. 24 फुटांचा परळीचा राजाची श्री राम रुपी मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ
08:20 AM (IST)
• 06 Sep 2025
Mumbai Ganesh Visarjan 2025: परळचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
मुंबईतील परळचा राजा मंडळाचा गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
• 06 Sep 2025
Mumbaicha Raja Visarjan 2025: मुंबईचा राजा मंडपातून निघाला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
मुंबईचा राजा मंडपातून निघाला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख. मुंबई राजा मंडपातून निघाल्यानंतर लालबाग परिसरातील गणपती विसर्जनासाठी निघणार
07:53 AM (IST)
• 06 Sep 2025
Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला 10 वाजता सुरुवात
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. बाप्पाला निरोप देताना लालबागचा राजा मंडळांच्या कार्यकर्त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
07:31 AM (IST)
• 06 Sep 2025
Mumbai Ganpati visarjan live 2025: मुंबईतील पहिला गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ, परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु
मुंबईतील पहिला गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ, परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु
07:28 AM (IST)
• 06 Sep 2025
Mumbaicha Raja Visarjan 2025: गणेशगल्लीचा गणपती थोड्याचवेळात विसर्जनसाठी मार्गस्थ होणार
गणेश गल्ली मुंबईचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आठनंतर सुरुवात होईल. त्याआधी हारांनी सजवलेला रथ गणेश गल्लीमध्ये पाहायला मिळतोय. याच रथामध्ये मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक होणार आहे
07:21 AM (IST)
• 06 Sep 2025
Lalbaugcha Raja visarjan 2025: लालबागचा राजाच्या विसर्जन मार्गावरील प्रमुख टप्पे
लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) : लालबाग उड्डाणपुलाखाली भाविकांचा पहिला निरोप.
भायखळा स्टेशन (पश्चिम) : डेलिसल रोडपासून S-ब्रिज ओलांडत मूर्तीचा पुढील प्रवास.
हिंदुस्तान मशीद, भायखळा : सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक मानला जाणारा हा थांबा. येथे मशिदीच्या समिती सदस्यांकडून दरवर्षी मूर्तीचे स्वागत केले जाते.
भायखळा अग्निशमन दल : अग्निशमन दलाच्या जवानांकडून लालबागच्या राजाला विशेष श्रद्धांजली वाहण्यात येते. मेगा अग्निशमन केंद्रातील सर्व वाहनांकडून गणेशमूर्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी सायरन वाजवून श्रद्धांजली वाहण्यात येते.
नागपाडा चौक (खडा पारसी/एस. मोहनी चौक) : रंगेबिरंगी विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या गर्दीचा मोठा टप्पा
गोल देऊळ/दो टाकी क्षेत्र : गजबजलेल्या बाल्कनी आणि गल्ल्यांसह ऐतिहासिक परिसर.
ऑपेरा हाऊस ब्रिज (सीपी टँक/प्रार्थना समाज/एसव्ही रोड) : येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक शेवटच्या टप्प्याकडे जाते.
गिरगाव चौपाटी : ‘पुढच्या वर्षा लवकर या’ म्हणत दुसऱ्या दिवशी पहाटे अरबी समुद्रात बाप्पाला शेवटचा निरोप दिला जातो.
[6/9, 06:05 am] J TEN NEWS: 07:12 AM (IST)• 06 Sep 2025
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाला निरोप देण्याची तयारी सुरु
लालबागच्या राजाला हार घालण्यात आला आहे. पूजेची तयारी सुरू आहे
07:07 AM (IST)
• 06 Sep 2025
Ganpati visarjan live 2025: मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला पावसाची हजेरी
मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला पावसाची हजेरी लागणार आहे. कालपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.
07:03 AM (IST)
• 06 Sep 2025
Ganpati visarjan live 2025: गणेश गल्लीचा गणपती थोड्याचवेळात विसर्जनासाठी निघणार
गणेश गल्लीचा गणपती हा मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो. हा गणपती मंडपातून निघाल्यानंतरच या परिसरातील बाकीचे गणपती विसर्जनसाठी निघतात.
07:02 AM (IST)
• 06 Sep 2025
Ganpati visarjan 2025: मुंबईत गणेश विसर्जनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
मुंबईत गणेश विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात. 10 हजार महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात.
06:53 AM (IST)
• 06 Sep 2025
Ganesh Visarjan 2025 : ‘या’ शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन
Ganesh Visarjan 2025 : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक; ‘या’ शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन, वाचा योग्य पूजा पद्धत आणि विधी. सविस्तर वाचा
• 06 Sep 2025
Ganpati visarjan live 2025: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक कधी निघणार?
लालबागच्या राजाची दर्शन रांग आता बंद करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघेल. लालबागाचा राजाची विसर्जन मिरवणूक उद्यापर्यंत चालणार आहे.
06:49 AM (IST)
• 06 Sep 2025
Ganpati visarjan live 2025: मुंबईत आज गणपती विसर्जन सोहळा
मुंबईतील पहिला मानाचा गणपती अशी ख्याती असलेल्या ‘विश्वविक्रमी’ मुंबईच्या राजाची विसर्जन आरती ठीक. सकाळी ८.०० वाजता सुरू होईल… व त्यानंतर गिरगाव चौपाटीच्या दिशेने विसर्जन मिरवणुक मार्गस्थ होईल



