महाराष्ट्र राज्य

मराठवाडा, विदर्भात पावसाचा हाहाकार, जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, गोदावरीला मोठा पूर, सोलापूरलाही पावसानं झोडपलं!

मराठवाडा, विदर्भात पावसाचा हाहाकार, जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, गोदावरीला मोठा पूर, सोलापूरलाही पावसानं झोडपलं!

Source :- J Ten News Media Team

मुखपृष्ठ / बातमी 

[14/9, 10:01 am] J TEN NEWS: Maharashtra Rains : मराठवाडा, विदर्भात पावसाचा हाहाकार, जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, गोदावरीला मोठा पूर, सोलापूरलाही पावसानं झोडपलं!

Maharashtra Rains : विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

[14/9, 10:01 am] J TEN NEWS: Maharashtra Rains : विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) कालपासून झालेल्या मुसळधार आणि ढगफुटीसदृश्य पावसामुळे (Rain) अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक भागांमध्ये नागरिकांचे स्थलांतर आणि शेतीचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर, बीड, जालना, आणि बार्शीसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाने झोडपले आहे.

[14/9, 10:02 am] J TEN NEWS: चंद्रपूर : इरई आणि वर्धा नद्यांना पूर, रहिवाशांचे स्थलांतर
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात काल रात्री जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. आधीच पूरसदृश्य स्थितीत असलेल्या जिल्ह्यात आणखी अडचणी निर्माण झाल्या. इरई धरणाचे सातही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शिरणाऱ्या वर्धा नदीच्या पाणी पात्रात देखील मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर शहरातील रहमतनगर आणि सिस्टर कॉलनी भागात नदीचे पाणी शिरले. जवळपास 50 ते 60 नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात दमदार पाऊस
बीडमध्ये कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून बिंदुसरा नदीसह इतर नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
या पावसामुळे जरी काही प्रमाणात समाधान व्यक्त होत असले तरी खरीप पिके आणि काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

[14/9, 10:02 am] J TEN NEWS: जालना जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वडीगोद्री, गोंदी महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. मांगणी नदीला पूर आल्याने नालेवाडी गावातील एक आदिवासी कुटुंब शेतात अडकले. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, मदतकार्य पथक पाठवण्यात आले आहे. भांबेरी व रेणापुरी गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

सोलापुरात मगर दिसल्याच्या चर्चेने एकच खळबळ
सोलापुरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. याच दरम्यान अंत्रोळीकर भागात मगर आढळल्याचा एक फोटो वायरल झाला. हा फोटो AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला असल्याचं स्पष्ट झालं असून, प्रत्यक्षात कोणतीही मगर सापडली नाही. वनविभागाने नागरिकांना भीती न बाळगण्याचे आवाहन केले असून, खोटे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

पैठण तालुक्यात गोदावरीला पूर; कुरण पिंपरीचा संपर्क तुटला
गोदावरी नदीत 1.15 लाख क्यूसेकने विसर्ग सोडल्यामुळे कुरण पिंपरी गावाचा पैठण तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक घरे जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अक्कलकोट : युवकाचा थरारक बचाव
अक्कलकोट तालुक्यातील केरसाळ परिसरात एक युवक पावसाच्या प्रवाहात वाहून जात असताना गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याचा जीव वाचवला. याबाबत थरारक व्हिडिओ समोर आला असून, नागरिकांनी नदी-नाल्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बार्शी तालुक्यात तुफान पावसाचा फटका; शेतीचं मोठं नुकसान
बार्शी शहर आणि तालुक्यातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौन्दने, शेलगाव या भागात तुफान पावसाचा फटका बसला. कांदा, उडीद, भुईमूग, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे शेतांचे तळ्यात रूपांतर झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस
धाराशिव जिल्ह्यातील कळंब, धाराशिव, उमरगा आणि लोहारा तालुक्यांमध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाला. कळंब तालुक्यातील शेलगाव जहागिरी गावातील ८ ते १० घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. या मुसळधार पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नद्या-नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

लातूरमध्ये पावसाचं दमदार पुनरागमन
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या स्वरूपात सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत मुसळधार झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले असून नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, काढणीला आलेल्या उडीद आणि मुगाच्या पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button