मुंबई

मनोज जरांगेंकडून चिचुंद्री म्हणून उल्लेख; आता देवेंद्र फडणवीसांनी मागण्या मान्य करताच नितेश राणे म्हणाले...

मनोज जरांगेंकडून चिचुंद्री म्हणून उल्लेख; आता देवेंद्र फडणवीसांनी मागण्या मान्य करताच नितेश राणे म्हणाले...

Source :- J Ten News Media Team

मुखपृष्ठ / बातमी 

[3/9, 9:43 am] J TEN NEWS: Nitesh Rane On Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंकडून चिचुंद्री म्हणून उल्लेख; आता देवेंद्र फडणवीसांनी मागण्या मान्य करताच नितेश राणे म्हणाले…

Nitesh Rane On Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण होताच भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

[3/9, 9:43 am] J TEN NEWS: Nitesh Rane On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या 8 पैकी 6 प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत. तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी घोषणा करत मनोज जरांगे यांनी काल 5 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण सोडलं.

[3/9, 9:44 am] J TEN NEWS: हैदराबाद गॅझेटियर तातडीनं लागू करण्यात येणार आहे. तर सातारा गॅझेटिरमधल्या त्रुटी दूर करत 15 दिवसात जीआर काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं. त्याचवेळी मराठा आणि कुणबी एकच आहेत ही जरांगेंची प्रमुख मागणी होती. या मागणीचा जीआर काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीनं मागण्यात आलं आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला आलेलं हे मोठं यश म्हणावं लागेल. दरम्यान, मनोज जरांगेंच्या मागण्या

पूर्ण होताच भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane On Manoj Jarange Patil) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाची जुनी मागणी होती, मराठवाड्यात कुणबी नोंदी होत्या. त्यांना आरक्षण द्यावं. हैदराबादगॅझेट प्रमाणे तो निर्णय आमच्या सरकारने घेतलाय. जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये…मराठा समाजाने याची दखल घेतली पाहीजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरीकांने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे, असं मंत्री नितेश राणे म्हणाले.

[3/9, 9:45 am] J TEN NEWS: फडणवीसांचे आभार मानावे तेवढे थोडेच- नितेश राणे
देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केलं, पण त्याच देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला न्याय दिला. मराठा समाजाला राणे समितीच्या अनुषंगाने जर कोणी आरक्षण दिलं तर ते फडणवीस सरकारने दिलं. आज ओबीसी समाजाला न दुखवता मराठा समाजाला न्याय दिला. जातीच्या नावावर हिंदू समाजाला तोडण्याचे प्रयत्न होत होते ते देवेंद्र फडणवीसांनी थांबवून दाखवले, त्यामुळे फडणवीसांचे आभार मानावे तेवढे थोडेच, असं नितेश राणेंनी सांगितले.

मनोज जरांगेंनी चिचुंद्री म्हणून नितेश राणेंचा केला होता उल्लेख-
चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहे का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. त्यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच, असा सज्जड दम देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.

नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आईबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. यावरुन नितेश राणे यांनी देखील मनोज जरांगेंवर निशाणा साधला होता. जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई-बहि‍णींचा आदर केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी. मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे. हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत नितेश राणेंचा चिचुंद्री असा उल्लेख केला होता.

मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय – मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत – मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी – मान्य
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे – मान्य
प्रलंबित जात पडताळणीला मान्यता – मान्य

मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या अमान्य?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी – 1 महिन्याची मुदत
मराठा-कुणबी एकच शासन निर्णय – 2 महिन्यांची मुदत

नितेश राणेंवर प्रश्न जरांगे म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button