*डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा*
*डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा*

Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ बातमी :- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा केलेबाबतची.
*डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा*
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगर येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस २४ सप्टेंबर,२०२५ रोजी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमासाठी *प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.गोकुळदास गायकवाड संचालक ई.टी.आय. रा.से.यो.अहिल्यानगर*, प्रा. मंदार बिडवे रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ. विखे पाटीलअभियांत्रिकी महाविद्यालय विळदघाट, तसेच प्रमुख उपस्थिती कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सोमेश्वर राऊत, प्रा.डॉ. हरिभाऊ शिरसाट उपप्राचार्य, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे, प्रा.जयश्री राऊत, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. दौलतराव नलावडे, प्रा.पुष्पा हसनाळे, प्रा.डॉ. माळवे, प्रा. पुनम ठोंबरे, प्रा.डॉ.ईश्वर गटुल, प्रा.डॉ.रोंगे, प्रा.डॉ.खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. गोकुळदास गायकवाड संचालक ई.टी.आय. राष्ट्रीय सेवा योजना अहिल्यानगर यांनी सामाजिक जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांनी राष्ट्र बांधणीसाठी आणि सामाजिक उत्कर्षासाठी आपले संकल्प पक्के करण्याबाबत व सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. सोमेश्वर राऊत प्राचार्य यांनी स्वयंसेवकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन मागदर्शन केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा इतिहास, विविध योजना तसेच वार्षिक नियोजित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच यापूर्वी मौजे नांदगाव, मांजरसुंबा, टाकळी काझी, हिंगणगाव आणि डोंगरगण या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आयोजित केलेल्या विशेष शिबिरांमधून विविध उपक्रमांची उदा. रक्तदान, स्वच्छता मोहीम, जल व मृदासंवर्धन, डिजिटल साक्षरता उपक्रम तसेच जनजागृतीद्वारे गावकऱ्यांना सामाजिक बांधिलकीचे धडे दिले.
या प्रसंगी बोलताना प्रा.मंदार बिडवे रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ.विखे पाटिल अभियांत्रिकी महाविद्यालय, विळद घाट यांनी राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व त्या अनुषंगाने समाजाची सेवा करण्याची संधी मिळते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना मधील स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच स्वयंसेवक कु.सौरभ नांद्रे, स्वयंमसेविका कु. प्रगती देवकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी व सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. प्रसाद पाटिल यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापक इतर सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

